
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर -क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे.जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड आयोजक 20 डिसेंबर ते 21डिसेंबर 22 शालेय विभागीय फुटबॉल स्पर्धा यामध्ये लातूर विभागातून उस्मानाबाद लातूर नांदेड .यामधून शहरी व ग्रामीण 14/ 17/ 19/ मुले व मुली वर्ष गट संघांनी सहभाग नोंदविला होता. संस्कृती संवर्धन मंडळ संचलीत राजषी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय जूनियर कॉलेज सगरोळी व श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल संघाने घवघवीत यश संपादन केले. 19आणी 14 वर्षे वयोगटातील मुलांनी प्रथम क्रमांक मिळून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होवून आपला बहूमान सिद्ध केला. नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी व नांदेड फुटबॉल संघटनेचे सेक्रेटरी यांनी येणाऱ्या 28व 30डिसेंबर ला होणाऱ्या कोल्हापूर येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व कौतुकाचा वर्षाव केला. राज्यस्तरीय पातळीवर एकूण36 विद्यार्थ्यांची निवड याबद्दल संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, संचालक रोहित देशमुख, सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संस्थेचे क्रीडा प्रमुख सर्व विभाग प्रमुख शिक्षक पालक सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षक मिर्झा वसीम बेग यांनी अभिनंदन केले आहे