
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:शहरातील भक्तापूर रोड भागातील २ घरे
फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज व नगदी रक्कम पळवली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त • होत आहे. डीबी प्रमुख रात्री कुठे जातात याची चर्चा आता होवू लागली आहे.
भायेगाव रोड परिसरातील साईनगर भागात राहणारे राम हाणमंत पाटील हे मुलांच्या शिक्षणासाठी देगलूर येथे राहतात. त्यांचे मूळ रा. एकलारा तेलंगणा असून गुरुवारी सायंकाळी घराला कुलूप लावून वेळ अमावस्यानिमित्त ते आपल्या गावाकडे गेले होते. गावाकडे जायाचे असल्याने त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोने घरी आणून ठेवले होते. मात्र त्यांच्या पत्नीने वेळ अमावस्याला जायचे आहे त्यामुळे सोने कशाला घालून जावे असा विचार करून घरात २ कपाटात सोने ठेवले होते. चोरट्यांनी २ कपाट फोडून ३ अंगठ्या, २ जोड सोन्याच्या पाटल्या, गंठण, २८ ग्रामचे दुसरे गंठण, मुलीचे ९ ग्रामचे लॉकेट, ५ हजारांचे चांदीचे दागिने व नगदी २ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
चोरट्यांनी घरातील सर्व डब्बे काढून बघितलेदुसऱ्या घटनेत भायेगाव रोडवरील आनंदनगर भागातील रहिवासी गणेश समर्थराव एकलारे (रा. औराळ ता. मुखेड) हे शहरात मल्टीसर्विसेसचा व्यवसाय करतात. ते सुध्दा घराला कुलूप लावून वेळ अमावस्यानिमित्त गुरुवारी सायंकाळी आपल्या गावाकडे गेले होते. चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातील साडे तीन तोळ्याचे सोन्याचे
दागिने, १५ तोळे चांदीचे दागिने, ७ हजार रुपये रोख रक्कम चालू बाजारभाव प्रमाणे असे १ लाख ७९ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. दोन्हीही घरे फोडणारे चोरटे एकच असून ते सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
देगलूर पोलीस ठाण्यात राम हणमंत पाटील (४०) यांच्या फिर्यादीवरून १८ तोळे सोने (०४ लाख ६५ हजारांचे दागिने व ०३ तोळे सोन्याचे तर १५ तोळे चांदीचे दागिने (०१ लाख ३४ हजार ५०० रुपये) असा एकूण ०५ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे करीत आहेत.नांदेडहून श्वानपथकास पाचारण करण्यात आले. दरम्यान शहरात ज्या घराला कुलूप आहे ते घर चोरट्यांनी फोडलेच असे समीकरण झाले आहे. शहरात चोरट्याचा हैदोस चालूच असून देगलूर पोलीसांची अकार्यक्षमता वारंवार सिद्ध होत असताना वरिष्ठ अधिकारी याबाबत काहीच पावले उचलायला तयार नसल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.