
दैनिक चालू वार्ता जांब प्रतिनिधी -किरण गोंड
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज, नांदेड येथील प्रा. सतीश गणपत खवले यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर्फे पी.एच.डी.प्रदान करण्यात आली. प्रा.खवले यांनी गणित विषयातील “Study of Some Thermoelastic Problems Using Fractional Differential Equations” या विषयावर डॉ. किशोर आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. त्यांनी पीएचडी दरम्यान नऊ पेपर प्रकाशन व आठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेऊन पेपर वाचन केले. सदर संशोधनासाठी त्यांना सारथी या शासकीय संस्थेचे आर्थिक सहाय्य मिळाले, त्याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी एक्स्ट्रानल रिफ्री डॉ. सत्य बीर सिंघ सर, चेअरमन डॉ. डी. डी. पवार सर, डॉ. के. एम. जाधव सर, डॉ. के. पी. घडले सर, डॉ. डी. डी. पवार सर, डॉ. के. एल. बोंदर सर, डॉ. वी. आर. मराठे सर, प्राचार्य, हेड ऑफ डिपार्टमेंट यांची उपस्थिती होती.डॉ.किशोर आर.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या संशोधनासाठी प्रा.सतीश खवले यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.