
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जागतिक अपंग दिनाच्या औचित्यावर अपंगांच्या क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषदेअंतर्गत समाज कल्याण विभागातर्फे आयोजित करणे अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्याने पदाचा दुरुपयोग व गैरवापर करून जो घोर अन्याय केला आहे, तो निषेधार्ह आहे. तद्वतच सदर अधिकाऱ्यावर निलंबनाची कठोर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे.
परभणी जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातर्फे दरवर्षी अपंगांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलात केले जाते परंतु यावर्षी जागतिक अपंग दिनाच्या औचित्यावर त्या स्पर्धा आयोजित न करता त्या रद्द करण्यात आल्या. याबाबतची तक्रार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मून यांच्याकडे केली आहे. संबंधित अधिकाऱ्याने मनमानी तर केलीच आहे.शिवाय आपल्या अधिकाराचा गैरवापर केला व अपंगांसाठीच्या असलेल्या हक्काच्या अधिकारावर गदा आणत जो घोर अन्याय केला आहे, तो निंदनीय व निषेधार्ह असल्याचे नमूद केले आहे.एवढेच नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुनील मूलगीर यांच्यातर्फे करण्यात आली आहे त्याशिवाय अपंगांसाठी आरक्षित ५% निधीतून अपंगांना पीठाच्या गिरण्या (चक्क्या) मंजूर करुन त्यांना व त्यांच्या परिवाराला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशीही मागणी लावून धरली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि अपंगांवर अन्याय करुन मुजोरपणा दाखवला आहे, त्याचा तीव्र निषेध केला आहे.
याप्रकरणी जि.प.मध्ये नव्यानेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे त्या कर्तव्य कठोर अशा श्री. मून साहेब यांनी तात्काळ कारवाईचा बडगा उगारला जावा अशी मागणी रेटून धरली आहे.