
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
अमरावती :-गेल्या काही महिन्या अगोदर दिनांक ७ ऑगस्ट रोजी वरूड येथे महापूर आला होता.त्यामध्ये वरुड शहरातील खडक पेड,मिरची प्लॉट सिंकलकर मोहल्ला,शनिवार पेठ,आंबेडकर चौक या भागातील बरेचसे घर वाहून गेले पण शासनाने अजून पर्यंत कुठलीच मदत केलेली नसून त्यासाठी वारंवार सामाजिक कार्यकर्ता सुशील बेले यांच्या मार्फत चक्काजाम व मोर्चे तहसील कार्यालयावर आणण्यात आले होते.त्यानिमित्य ५-६ हजार रुपये अनुदान म्हणून सहानुभूती मदत सुरुवात ला करण्यात आली होती पण सहानुभूती मदत म्हणून शासनाने जवळपास १० ते १५ हजार रुपये असे शासन नियमाप्रमाणे करण्यात आले होते ते पैसे अजून पर्यंत पूर्ण मिळाले नाही म्हणून आज सोमवार दिनांक २६ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता असंख्य पूरग्रस्त नागरिकाना घेवून सुशील बेले यांनी तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन दिले.चार दिवसाच्या आत उर्वरित रक्कम सर्वांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावी,सर्व पूरग्रस्त नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात यावे,नदीला संरक्षण भिंत बांधून देण्यात यावे,पुढील आपले नियोजन काय आहे ते संपूर्ण जाहीर करून पत्र देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देतेवेळी सुशील बेले सतीश मेश्राम,अमर हरले,ताहीर खान,निलेश ब्राह्मणे,शेख समीर,नाना धोटे,सिराज शेख,शेख सलमान,राजेश ठाकरे,विक्की दुर्गे,आकाश वाघमारे,बंसती बाई तुमडाम,सरीता उयके,रेखा युवनाते असंख्य महिला व पुरुष पूरग्रस्त यावेळी उपस्थित होते.