
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————-
हडपसर :- भेकराई
स्कॉलर इंडयुकेशन फाऊंडेशन संचलित स्कॉलर ऑफ़ स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन भेकराईनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे उदघाटन प्रजिल हरपळे, सागर कुते मुजम्मील इनामदार, अल्फाज पटेल यांच्या हस्ते झाले सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले मुलींनी निर्मिक व्हावा, कराटे शिकावे स्वताचे संरक्षण करावे. कोणालाही न घाबरता आपले संरक्षण करावे आसा संदेश या मर्दानी नृत्याद्वारे देण्यात आला. तसेच महीला शिक्षकांनी मोठ्या उत्साहात नृत्या सादर केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सायली म्हात्रे व आदी माण्यावर शिक्षक स्टाफ यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता नागवाडे ज्योती जवळकर वंदना जगदाळे या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित राहिल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष शहानुर पटेल यांनी त्यांचे आभार व्यक्त केले