
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-दर्यापूरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठान,दर्यापूर यांच्या वतीने देशाचे पहिले कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दर्यापूर येथे गुरुवार दि.२९ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता राज्यातील आदर्श ग्राम पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम शहरातील शेतकरी सभागृह येथे होणार असून यावेळी दर्यापूर तालुक्यातील नवनिर्वाचित २५ ग्रामपंचायत सरपंच यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील ग्रामविकासाचा मूलमंत्र या विषयावर संबोधित करणार असून डॉ.पंजाबराव देशमुख यांचा जीवन प्रवासावर प्रा.डॉ.देवालाल आठवले आपले विचार व्यक्त करणार आहेत.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दर्यापूरचे आ.बळवंत वानखडे तर उदघाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून दर्यापूर तहसीलदार डॉ.योगेश देशमुख,जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भासाकळे,माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर,ठाणेदार विनायक लंबे,गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले आदी उपस्थित राहणार आहेत. दर्यापूर तालुक्यात प्रथमच सदर कार्यक्रम आयोजित कार्यक्रमाचा तालुक्यांतील नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानेचे अध्यक्ष प्रा.आशिष शिवाजीराव देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.