
दैनिक चालू वार्ता लातूर उपसंपादक-प्रा. मारोती पाटील बुद्रुक
अहमदपूर दि.27
जेष्ठ पत्रकार तथा संपादक बी.व्ही.मोतीपौळे(संपादक,दैनिक यशवंत,लातूर) यांना साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘दर्पण जीवन गौरव राज्य पुरस्कार 2022’ जाहीर झाला आहे तर स्थानिक पातळीवर पत्रकार म्हणून कार्यरत असणारे जेष्ठ पत्रकार प्रा.मारोती बुद्रुक-पाटील( दै.चालु वार्ता कार्यकारी उपसंपादक लातूर) व विलास चापोलीकर (पत्रकार दै.यशवंत अहमदपूर) आणी विनोद निला(पत्रकार दैनिक पुण्यनगरी चाकूर)यांना ‘दर्पण सेवा गौरव पुरस्कार 2022’ देवून गौरव करण्यात येणार आहे.
साहित्य संगीत कला अकादमी (महाराष्ट्र)अहमदपूर जि.लातूर च्या वतीने प्रत्येक वर्षी पत्रकारीता क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीस ‘दर्पण जीवन गौरव पुरस्कार दिला जातो.शाल-स्मृतीचिन्ह, लेखनी,मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.या पूर्वी जयप्रकाश दगडे(लातूर),राही भिडे मॅडम(मूंबई),राजा माने (सोलापूर), अशोक सूरवसे(मूंबई),अतुल कुलकर्णी (मूंबई),किरण तारे(मूंबई)प्रा.रामेश्वर बद्दर आदींना हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे.
यंदाचे हे सोळावे वर्ष आहे.
तसेच अहमदपूर व चाकूर तालूक्यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणा-या दोन जेष्ठ पत्रकारांची प्रत्येक वर्षी पूरस्कार निवड समितीच्या वतीने निवड करण्यात येते.यंदा जेष्ठ पत्रकार प्रा.मारोती बुद्रुक -पाटील(दैनिक चालू वार्ता कार्यकारी उपसंपादक लातूर ) विलास चापोलीकर(दैनिक यशवंत)व विनोद निला ( पत्रकार, दैनिक पुण्यनगरी) यांना ‘दर्पण सेवा गौरव पुरस्कार 2022’ देण्यात येणार आहे.शाल- स्मृतीचिन्ह- मानपत्र पूष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पूर्वी हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार मा.रा.कराड,प्रा.एस.एम.कूलकर्णी,अ.ना.शिंदे,उदयकुमार जोशी,संदीप अंकलकोटे,बाबूराव श्रीमंगले,रवीकांत क्षेत्रपाळे,प्रशांत शेटे,सूरेश डबीर,सूधाकर हेमनर,दिनकर मद्देवार,संतोष अचवले,भारतसिंह ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे.
हा पूरस्कार आचार्य बाळशात्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ अहमदपूर जि.लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती साहित्य संगीत कला अकादमी चे अध्यक्ष युवक नेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, लक्ष्मणराव अलगूले,गणेश मदने, सय्यद याखूब,विलास चापोलीकर,अजय भालेराव,प्रा.अनिल चवळे,गफारखान पठाण,आकाश सांगविकर, जीवनराड, प्रा.डाॅ.बालाजी कारामूंगीकर,मोहम्मद पठाण,तरबेज सय्यद, प्रा.दिपक बेले,शिवाजी भालेराव,गणेश शिंदे,राजू सूर्यवंशी, दिलीप भालेराव, प्रा.उध्दव श्रंगारे,सागर क्षीरसागर,प्रशांत जाभाडे,ईश्वर कांबळे, बालाजी मस्के,सय्यद नूर,सय्यद नौशाद यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
==============