
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील युवा शेतकरी रत्नाकर गंगाधर ढगे यांना शेती क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून व इतरही शेतकऱ्याला नवनवीन बी बियाणे विकसित तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केल्यामुळे मराठवाड्याचे जलनायक डॉ शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत लोहा कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे व पंचायत समिती कृषी विभागातील सर्व अधिकारी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते यावेळी रत्नाकर पाटील यांनी माळेगाव यात्रेतील पिक प्रदर्शन मध्ये आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये केलेले नवनवीन प्रयोग आपल्या भाषणांमधून सांगितले व नैसर्गिक शेती काळाची गरज आहे आणि नैसर्गिक शेती शंभर टक्के करणे शक्य आहे त्यासाठी दोन गोष्टी ची सांगड घातली पाहिजे एक बांधावरील वृक्ष आणि दुसरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आणि शेतीसाठी खत निर्मिती करण्यासाठी जनावरे सांभाळणे महत्त्वाचे आहे रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे जमीन दिवसेंदिवेश नापीक होत चालली आहे आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढत चालला आहे यावरही शेतकऱ्यांनी अभ्यास करून येत्या काळामध्ये नैसर्गिक शेतीकडे वळावे असे सांगितले शेतकऱ्यांनी गट शेती करून आपली प्रगती करून घ्यावी गट शेतीमध्ये सर्व शेतकरी एकत्रित आल्याने अशक्य गोष्टी शक्य होतील आणि गट शेतीला कृषी विभागाकडून खूप मोठ्या मोठ्या योजना आहेत या योजनेचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीमध्ये प्रगती करावी असे हजारो शेतकऱ्यांना रत्नाकर पाटील यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी डॉ शंकरराव चव्हाण शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल सह पत्नी अभिनंदनही केले