
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
नांदुरा (प्रतिनिधी):- नांदुरा पंचायत समिती अंतर्गत जानेवारी महिन्यात मंजूर करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या विहिरींची कामे सुरू करण्यासाठी शेतकरी तब्बल वर्षभरापासून पंचायत समितीच्या चकरा मारत आहेत पण रोजगार हमी विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी डिसेंबर महिना आला तरी हेतुपुरस्करपणे शेतकऱ्यांना विहिरीपासुन वंचित ठेवले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ विहिरीचा लाभ मिळावा यासाठी पंचायत समिती नांदुरा येथे सोमवारी मा.उपसभापती योगिता गावंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
नांदुरा तालुक्यातील 13 गांपंचायतीना 2021 मध्ये 105 विहिरींचे उद्दिष्ठ प्राप्त झाले होते .त्यापैकी 95 विहिरींना जानेवारी 2022 मध्ये प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. जानेवारी पासून जून, जुलै पर्यंत विहिरी खोदणे शक्य होते पण रोजगार हमी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध कारणे सांगत शेतकरयांना ताटकळत ठेवले. आता पावसाळा संपून 2 महिने उलटले असले तरी अद्याप विहिरी सुरू केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे उप जिल्हाधिकारी रोहयो यांचे नाव सांगून सध्या विहिरी करता येणे शक्य नाही असे साहेबांचे म्हणणे असल्याचे गायकवाड या कर्मचाऱ्याने शेतकरयांना व काही माजी लोक प्रतिनिधींची सांगत दिशाभूल केली आहे.
शंभर शेतकऱ्यांना प्रत्येकी 3 लाखाप्रमाने मिळणारा एकूण 3 कोटींचा लाभ या कर्मचाऱ्याने आपल्या स्वार्थासाठी थांबवून ठेवल्याने संतप्त होत सोमवारी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ योगिता गावंडे यांचेसह मा.सभापती शिवाजीराव पाटील मा.सभापती गजानन चरखे, बंडूभाऊ चोपडे, प्रशांत वडोदे, सरपंच संघटना अध्यक्ष तथा शेंबा सरपंच ॲड.नंदकिशोर खोंदले, कार्याध्यक्ष तथा खदडगांव सरपंच प्रवीण मानकर, निमगांव सरपंच विकास इंगले, सिरसोडी सरपंच हर्षवर्धन सरदार, सावरगाव सरपंच भागवत लांजुळकार, अवधा सरपंच राहुल खंडेराव, विटाळी सरपंच पुत्र विष्णू क्षीरसागर यांचेसह लाभार्थी शेतकरयांनी गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्या दालनासमोर सोमवारी आंदोलन केले.
सदर आंदोलनाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी रोजगार हमी योजनेच्या विहिरींची कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आंदोलनकर्त्यांच्या समक्ष रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.त्यामुळे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत असून शेतकरी बांधवांच्या विहिरींचे कामे तात्काळ सुरू न झाल्यास पुढील आंदोलन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे करण्यात येईल असा इशारा मा.पं.स.उपसभापती योगिता गावंडे यांनी दिला आहे.
======================
विहिरी मंजूर होऊन वर्ष उलटले आहे. स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शेतकरयांना लाभापासून वंचित ठेवले आहे. शासनाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार हमी योजना अस्तित्वात आणली असली तरी नांदुरा पंचायत समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी योजनेचा उद्देशच मातीत घातला आहे. याबाबत शेतकऱ्यांना विहिंरीचा लाभ मिळेपर्यंत आवश्यक तो सर्व पाठपुरावा करनार आहे.
-सौ.योगिता संदिप गावंडे
(मा.उपसभापती पंचायत समिती नांदुरा)
======================
नांदुरा तालुक्यात मंजूर विहिरी
ग्रामपंचायत विहिरींची संख्या
1) काटी. 9
2) बुर्टी. 7
3) धानोरा (वि) 7
4) विटाळी 9
5) सिरसोडी 11
6) सावरगाव चाहू 6
7) वडगाव दिघी 4
8) भोगलवाडी 0
9) पिंपलखुटा खू. 6
10) टाकरखेड 18
11) शेंबा बू. 7
12) तांदुलवाडी 5
13) शेम्बा खू. 4
एकूण 93
मंजुरी बाकी 12
एकूण उद्दिष्ट 105