
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
पुणे दि. २८: पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जानेवारी २०२३ मध्ये खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ५ आणि ६ जानेवारी रोजी खेड, ९ आणि १० जानेवारी रोजी मंचर, १६ आणि १७ जानेवारी रोजी जुन्नर, २३ आणि २४ जानेवारी रोजी वडगाव मावळ आणि ३० जानेवारी रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३० डिसेंबर २०२२ रोजी सायं. ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे.