
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मनिषा शिंदे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांची चौकशी चालू आहे. जर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार, अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कार्यकर्त्यांना दिली.
देगलूर येथील मनीषा शिंदे यांची प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान स्त्रीरोगतज्ज्ञ ठक्करवाड यांनी लावलेला विलंब व सेवेतील हलगर्जीपणामुळे सौ. शिंदे यांचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. या प्रकरणी शहरातील सर्वसमाज बांधवांमध्ये मोठा आक्रोश उफाळून आला आहे. या संवेदनशील विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी गुरुवार, दि. २९ रोजी सांगितले. येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात कार्यकर्त्यांची बैठक बोलावून प्रकरणाची माहिती जाणून घेतली.
या वेळी मयत मनिषा शिंदे यांचे पती प्रभाकर शिंदे यांनी घटनेची इत्यंभूत माहिती भोसीकर यांना दिली. सर्व परिस्थितीची माहिती जाणून घेतल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. भोसीकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मनीषा शिंदे मृत्यूप्रकरणाची चौकशी चालू आहे, दोषींवर कारवाई केली जाणार, असे स्पष्टपणे
या वेळी माजी नगरसेवक सुशीलकुमार देगलूरकर, माजी नगरसेवक अविनाश निलमवार, अशोक कांबळे, कपिल उल्लेवार, • विकास नरबागे, सचिन कांबळे, मुन्ना पोवाडे, रॉनी दुगाने, राहुल सोनकांबळे, विजय बकरे, स्वप्नील बकरे, जयपाल कांबळे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.