
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयात मागील बऱ्याच कालावधीपासून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांची मोठी वाणवा आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून रिक्त आणि नवीन जागांवर तातडीने नियुक्त्या केल्या जाव्यात अशी मागणी रुग्ण हक्क समितीने केली आहे
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे उपचाराअभावी प्रचंड हाल होत आहेत. येथे कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी अथवा परिचारिकांची अन्यत्र बदली झाल्यास, सेवा निवृत्ती घेतल्यास किंवा मध्येच सोडून गेल्यास रुग्णांना वेळेवर उपचार होऊ शकत नाहीत. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या भयानक आहे तर दुसरीकडे बदलतं हवामान आणि नैसर्गिक तथा संसर्गजन्य परिस्थितीमुळे कमालीची रुग्णांच्या वाढीस लागत आहे. तर दुसरीकडे वेळेवर आणि तत्परतेने उपचार केले जावेत यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठी वाणवा आहे. त्याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदतनीस म्हणून आवश्यक अशा परिचारिकांनी संख्या सुध्दा कमालीची घटली जात आहे. त्याचाच परिपाक म्हणून वेळेवर आणि हवी तशी उपचार पध्दती केली जाणे दूरापास्त होत असते. कधी कधी तर त्या अपुऱ्या सेवेचा विपरित परिणाम सुध्दा होत असतो.
वेळेवर आणि चांगला उपचार मिळणे ही बाब हक्काची असली तरी रिक्त जागांची पूर्ती होत नसल्याने ते शक्य नसते. या व अशा अनेक समस्या ध्यानी घेऊन रुग्ण हक्क समितीने नुकताच परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना एका लेखी निवेदनाद्वारे अवलोकन केले आहे. या समितीचे सचिव डॉ.सुनील जाधव यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील या सर्व रिक्त आणि नव्याने जागा तातडीने भरण्यात याव्यात यासंबंधीचे एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी वरील प्रमाणे मागणी नमूद करुन रुग्णांच्या हक्कावर येणारी गदा लवकर दूर करावी अशी मागणी केली आहे.