दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..मकरसंक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली आहे; मात्र आत्तापासूनच तीळ आणि गुळ व तिळापासून तयार होणारे पदार्थ महागायला सुरुवात झाली आहे. सध्या तिळाचे भाव बाजारात 180 ते 200 रुपये किलो आहे. मागील वर्षी 130 ते 150 रुपये प्रति किलो विकल्या जाणाऱ्या तिळाचे दर सरासरी 30 ते 50 रुपयांनी संक्रांतीच्या तोंडावर वाढले आहेत, तर दुसरीकडे गुळ्याच्या किमती किलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे यंदा तिळगुळ मागणार आहे. तर ती आत्तापासूनच विकत घ्यायचे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे यंदा तिळगुळातील गोडवा कमी होणार आहे. भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकरसंक्रांत. हा सण खरोखर भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहीना या दिवशी तिळगुळ देऊन “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला”, असे म्हणून एकमेकांशी प्रेम संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जात असते. जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तिळगुळ दिले जाते दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव वाढले आहे. उत्पादन घटल्यामुळे तिळाचे भाव वाढले त्यामुळे यंदाची मकरसंक्रांत तिळगुळातील गोडवा कमी करणारी ठरणार आहे.


