दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: २९ व ३० जानेवारी रोजी कामगार कल्याण मंडळाची राज्यस्तरीय कामगार पुरूष व खुली महिला भजन स्पर्धेचे तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजन
औरंगाबाद महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्यस्तरीय कामगार पुरूष व खुली महिला भजन स्पर्धा दिनांक २९ व ३० जानेवारी २०२३ रोजी तापडीया नाट्यमंदिर औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे. सन २०१९ साली सदर स्पर्धेचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते. कोरोना साथीमुळे गेल्या ०२ वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी सदर स्पर्धेचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात आले आहे
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील १९ गट कार्यालयांच्या वतीने दरवर्षी प्राथमिक स्तरावर कामगार पुरूष व खुली महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात येते. सदर प्राथमिक स्पर्धेतील विजयी संघ सदर राज्यस्तरीय स्पर्धेत त्या त्या गट कार्यालयाचे प्रतिनिधित्व करतील. कामगार कल्याण निधी कपात होणारे कामगारांसाठी कामगार पुरूष भजन स्पर्धा आयोजित केली जाते व महिलांसाठी सदर भजन स्पर्धा खुली असते.
महाराष्ट्रातून औरंगाबाद, नांदेड, लातूर, जळगांव, नाशिक, नागपुर – १ व २ चंद्रपुर, अकोला, अमरावती, ठाणे, नायगांव, अंधेरी, चिपळूण, पुणे, सांगली, सोलापुर, कोल्हापुर या १९ गट कार्यालयाचे १९ कामगार पुरूषांचे तसेच १९ महिलांचे असे एकुण ३८ संघ या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त श्री रवीराज इळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सदर स्पर्धा प्रेक्षकांसाठी खुली असुन स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण
मंडळाचे मराठवाडा विभागीय सहा. कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.


