दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:अनेक संसारे करणाऱ्या व तसेच जीवघेण्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्य प्रमाणकार्य करीत मरखेल पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही करून दाखवली. कारण बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या जुगार नावाचा पत्त्याच्या डावावर मरखेल पोलिसांनी दि. १० जानेवारी २०२३ रोजी १:१५ वाजेच्या सुमारास मौजे बेंबरा तांडा येथील हॉटेलच्या बाजूच्या रोडवर धाड टाकून बारा जणांना अटक करून गुन्हा दाखल केले आहे.
उध्वस्त
यामध्ये आरोपी १) नरसिंग माली पाटील वय २६ वर्ष व्यवसाय चालक रा. नागमपल्ली ता. नारायणखेड जि. संगारेड्डी, २) भोजीराम नाईक राठोड वय ३५ वर्ष व्यवसाय मजूरी, ३) सिद्धप्पा
संगप्पा जंगम वय ५० वर्ष व्यवसाय मजूरी, ४) नरसामल्लू गुंडाप्पा मुदिराज वय ४२ वर्ष व्यवसाय मजूरी आरोपी नं. २, ३, ४ हे तिघेही राहणार गाजूलपाड ता. नारायणखेड जि. संगारेड्डी, ५) दत्तू गुंडेराव बिरादार वय ४० वर्ष व्यवसाय मजूरी रा. चापता ता. नारायणखेड जि. संगारेडी, ६) दत्तात्रय पोकलवार वय २८ वर्ष व्यवसाय व्यापार रा. औराद जिल्हा बिदर, ७) सुभाष माधवराव लादे वय ३७ वर्ष व्यवसाय शेती रा. आला. घूळा ता. मदनूर जि. कामारेड्डी, ८) सचिन जगन्नाथ कोळी वय ३० वर्ष व्यवसाय व्यापार रा. औराद जि. बिदर, ९) नूर अहमद मुल्लासाब मुल्ला वय ३३ वर्ष व्यवसाय सहाय्यक मजुरी रा.येडूर बु. ता. देगलूर, १० ) महेसप्पा ईरन्ना पारशेट्टी आरोपीवर वय ४० वर्ष व्यवसाय शेती रा. चोबनपल्ली ता. नारायणखेड जि. संगारेड्डी, ११) राजू संगप्पा बिरादार वय ३३ वर्ष व्यवसाय मजूरी रा. तडकल ता. नारायणखेडजि. संगारेड्डी, १२) जगदिश रामराव जाधव वय ३८वर्ष व्यवसाय शेती रा. हाळी ता. देगलूर अशा एकूण बारा आरोपींना पकडून यांच्याकडून रोख अंदाजीत रक्कम सदोतीस हजार दोनशे सत्तर रुपये (३७२७० रु) व दोन काम यांची किंमत अंदाजे पाच लाख आकाश रुपये ( ५००००० लाख रुपये) असे दोन्ही मिळून पाच लाख सदोतीस हजार दोनशे सत्तर (५३७२७० रुपये) रुपयाचा माल जप्त करण्यात
यावेळी गु र नं १२ / २०२३ कलम १२ ( अ ) म. जु. का. अन्वये फिर्यादी नामदेव शिवाजी मद्दे वय ४० वर्ष व्यवसाय पोलीस निरीक्षक पोलिस ठाणे मरखेल हे असून झडज छडझउ १२०६ गुन्हा दाखल केले असून आरोपींना लीलि ४१ अ ची नोटीस देऊन सोडण्यात आले तर पुढील तपास पो.हे.कॉ./९४ बारी शेख हे करीत आहेत.


