
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव . .
नांदेड शहरातील विविध उपक्रमाने सतत चर्चेत असलेले शैक्षणिक क्षेत्रात पहिल्या तीन क्रमांकार नावारूपाला आलेले श्री शिवाजी हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेड हे नाव परिसरातील तमाम जनतेच्या ओठावर आपसुकच येते याच श्री शिवाजी हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेड येथे स्वराज्य संस्थापक तथा बहुजन प्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब तसेच युवकाचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवा च्या निमित्ताने हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य माननीय सुधीर भाऊ कुरुडे यांच्या शुभ हस्ते राजमाता , राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. . . याप्रसंगी कॉलेजचे चे सर्वच प्राध्यापक बंधू आणि भगिनी तथा हायस्कूलचे सर्वच ज्येष्ठ व कनिष्ठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मातोश्री माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर सुंदर भाषणे केली. . . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.जामकर दिपाली यांनी केले.