 
                दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर ;
बाळासाहेबांची शिवसेना तथा शिंदे गटाच्या शिवसेना देगलूर तालुका प्रमुखपदी कट्टर शिवसैनिक असलेले अंबेसंगे घाळप्पा शेवाळकर यांची नुकतीच मुंबई येथील शिवसेना भवन कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना नियुक्तीचे पत्र सचिव संजय मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी संपर्कप्रमुख आनंद जाधव ,जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, सह संपर्कप्रमुख गंगाधर बडुरे व आकाश रेड्डी , व्यंकट पूरमवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसेनापैकी एक कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्ह्यात ओळख असलेले अंबेसंगे घाळप्पा शेवाळकर यांच्या नावावर तालुका प्रमुखांचा शिकामोर्तब होण्यापूर्वी एका माजी आमदाराने आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी बरीच ताकतपणाला लावली होती मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेत ख-याखु-या कार्यकर्त्याला किंवा निष्ठावंतांनाच न्याय दिले जात असल्याची पुष्टी अंबेसंगे यांच्या निवडीवरून दिसून आली.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जी जबाबदारी सोपवली आहे. ती मी सार्थ करीत तालुक्याच्या ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करीन आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी आटोकट प्रयत्न करणार असे नूतन तालुकाप्रमुख आंबेसंगे घाळप्पा यांनी सांगितले आहे.
या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे



 दैनिक चालु वार्ता
                                        दैनिक चालु वार्ता                     
                 
                 
                