
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी :-संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहरातील नवयुगांचे लवकर पैसे कमवायच्या नादा मध्ये या मटक्याच्या नादाला लागून आपले आयुष्य बरबाद करत आहेत देगलूर शहरांमध्ये जागो जागी हॉटेल पान टपरी या ठिकाणी सर्रास मटका घेणे चालू आहे असे दिसत आहे. याकडे जाणून-बुजून पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का असेच दिसत आहे. पोलीस प्रशासन व मटका माफिया मध्ये कुठेतरी संगनमताने हे काळे धंदे सर्रास देगलूर शहरांमध्ये चालू आहेत का असे कुठेतरी प्रश्नचिन्ह देगलूर शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे ? तरी प्रशासनाने या मटका माफियांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून देगलूर शहरातील नवयुवकांचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवणे गरजेचे आहे यामुळे देगलूर शहरातील गुन्हेगारी कमी होईल व नवयुकाच्या आयुष्य बरबाद होण्यापासून वाचेल असे देगलूर शहरातील नागरिकांमध्ये चर्चा होत असताना दिसत आहे.