
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – सहकाराची समृध्द परंपरा जतन करत सहकाराला सामाजिक कार्याची जोड देऊन बुलडाणा अर्बनच्या सामाजिक उपक्रमामुळे कित्येक गरजु कुटुंबियांना आधार मिळत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी केले.
शहरातील बुलडाणा अर्बनच्या शाखेत मयत कर्जदाराच्या वारसदार श्रीमती सुमन संजय गड्डमवाड यांना विमा संरक्षण रक्कम २ लक्ष एकोण ऐंशी हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले कि, बुलडाणा अर्बन नेहमीच ग्राहक, लघुउद्योजक व शेतकरी सभासदांच्या हितासाठी आर्थिक व सोशल बँकिंग राबविणारी आशिया खंडात सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जात असल्याचे गौरवोद्गार नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी काढले. बुलडाणा अर्बन लोहा शाखेत संजय विश्वनाथ गडमवाड यांचे सोने तारण कर्ज रू. दोन लक्ष एकोण ऐंशी हजार घेतले होते.परंतू त्यांचा मोटर सायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू दिनांक ०९.०८ २०२२ रोजी झाला संस्थेच्या वतीने सभासदांच्या कर्जाला विमा संरक्षण देण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल संचेती यांच्या मार्गदर्शनानुसार शाखा व्यवस्थापक केशव शेट्टी यांनी परिवाराचे स्वांतन करून सदर अपघात संदर्भात माहिती दिली व कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव मुख्यालयास सादर करण्यात तो मंजुरही झाला.
यावेळी नगरसेवक भास्करराव पाटील पवार,अमोल सावकार व्यवहारे,संदीप दमकोंडवार,शेख नबी तसेच बुलडाणा अर्बन शाखा व्यवस्थापक केशवराव शेटे साहेब,भारत चव्हाण,शेषेराव कंकाळ,साईनाथ सूर्यवंशी,ओमप्रकाश सोनवळे, अक्षय माळोदे,प्रवीण कदम,ऋषिकेश खरात,अंकुश गीते,बंडू ढगे,अल्पबचत प्रतिनिधी इरमलवार,महाजन,गुडमेवार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अतिशय सुरेख सूत्रसंचलन व प्रास्ताविक नगरसेवक भास्कर पाटील पवार यांनी केले