
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी पुरीगोसावी
प्रजासत्ताक दिनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने सीएपीएफ आणि राज्यांतील पोलीस दलातील एकूण ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध सेवा पदके जाहीर करण्यात आली. देवेंन भारती डीजीपी आणि अनुपकुमार सिंह अतिरिक्त पोलीस महासंचालक मुंबई यांच्यासह सातारच्या जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांचा समावेश. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना गडचिरोलीत केलेल्या सेवेसाठी आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्येला त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदके जाहीर झाले आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्या बदलीनंतर गडचिरोलीहून अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष आणि सातारच्या ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून अडीच महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारलेले जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना गडचिरोली येथे उत्कृंष्ट सेवेबद्दल आंतरिक सुरक्षा पदक जाहीर करण्यांत आले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून दोन वर्ष सेवा बजावली तसेच त्यांनी यापूर्वीही सातारा जिल्ह्यांमध्ये काम केल्यांमुळे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना सातारच्या जिल्हा विषयी चांगलीच माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्यांमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यांतील सर्व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच जिल्हा प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी संपर्काच्या माध्यमांतून पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा देण्यांत आल्या.