दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (तिवसा) :- अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रेलरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुकुंज मोझरी येथील आशीर्वाद बियर बार नजीक घडली आहे.अपघाता दरम्यान ट्रेलर चालक पसार झाला होता.मात्र;पोलीसांनी त्याला कही वेळा नंतर अटक केली.घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत तिवसा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी १ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरकडे भरधाव जाणारा ट्रेलर क्रमांक जीजे,१५ ऐव्ही ४५१४ याच दरम्यान विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ बीएन २४८५ दुचाकी चालक,आशीर्वाद बियर बार जवळून विरुद्ध दिशेने येत असताना महामार्गावरील वळणावर ट्रेलर चालकाने दुचाकीस्वार छत्रपती भोकरे,यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या दुर्घटनेत छत्रपती भोकरे यांचा दुर्दैवी अंत झाला.
सदरच्या घटनेची माहिती युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले असून याबाबत तिवसा पोलीस प्रशासन यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.