
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भू म:- वाशी शहरातील शिव शारदा शिक्षण प्रसारक बहुद्देशीय मंडळ,संचलित निवासी मुकबधीर मतिमंद विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे सौ.वर्षाताई मोहळकर ( अध्यक्ष,व्हि.डी.मोहळकर फाउंडेशन ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन करण्यात आली.
कार्यक्रमा वेळी प्रजासत्ताक दिनाचे दिव्यांग मुलांना महत्त्व सांगुन कार्यक्रमाची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय मोहळकर ( चेअरमन,तांत्रीक वीज कामगार सह.पतसंस्था मर्या.उस्मानाबाद.) होते.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्याचा सत्कार संस्था अध्यक्ष सौ.माने मॅडम यांनी केला तर अध्यक्षांचा संस्थेचे उपाध्यक्ष उमेश भायगुडे यांनी केला.
यावेळी सुजित मोहळकर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षकांचे कौतुक केले.जिल्हा स्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा मध्ये प्रथम यश संपादन केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शिक्षक यांनी करुन दिली. कार्यक्रमाच्या वेळी मोहळकर कुटुंब यांच्या वतीने शाळेतील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव प्रताप भायगुडे सर ,संचालक मधुकर माने साहेब,उत्कर्षा मोहळकर,अभिषेक मोहळकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.