
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आदर्श हा पिढीदर पिढी वाढत असतो किंवा कमी होत असतो . विद्यमान पिढी पुढच्या पिढीला काय आदर्श देतो हे येणार्या पिढीच मुळ भागभांडवल असतं . भागभांडवल हेच भावी दिशा ठरवते .मग आपण आपल्या येणार्या पिढीला सुदृढ आरोग्या संपदा मानसिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी निरोगी पिढीच्या निर्मिती मध्ये निर्व्यसनी समाज व्यवस्था हि मोठी उपलब्धता आहे. हि उपलब्धता निर्माण करण्यासाठी सगळ्यांचं योगदान असलच पाहिजे. आपण व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य उध्वस्त व्हावं असं मनोमन कोणालाही वाटत नाही . स्वतःलाच खोटा धीर देत देत मनाचं खोटं खोटं समाधान करण्याच्या नादात आपण कधी मनाचे गुलाम होऊन व्यसनी होतो याचा थांगपत्ता लागत नाही. पत्ता लागल्यावर सुद्धा तिथुन बाहेर पडण्याची ताकद क्षमता आपल्या मध्ये उरत नाही.हि मात्र दुर्दैवी बाब आहे.चुकुन हुकुन जरी व्यसन जडल असलं तरी त्यांचं नियंत्रण आपल्यावर निर्माण होण्या अगोदरच त्याला नमस्कार करता आला पाहिजे.जर असं झालं नाही तर मग मात्र आपण गुलाम बनतो.एकदा का गुलाम झालो कि मग शिल्लक उरत काय . मर्यादा हाच प्रत्येक बाबीवर अंतिम उपाय असतो. मर्यादा पालन करा मर्यादित रहा कहीही अहितकारक होणार नाही. दैनंदिन जीवनावर मजबूत पकड घट्ट प्रभाव निर्माण करणारी बाब म्हणजे व्यसन .हेच व्यसन अनेक प्रकारच असल्याने त्याचे काही परिणाम चांगले येतात तर काही परिणाम खूप वेदनादायक असतात. व्यसन चांगल्या बाबीच असेल तर ते लाभदायक ठरत पण हेच व्यसन विघातक बाबीच असेल तर जीवन उध्वस्त करून सोडत . जीवनाला उध्वस्त करणार्या बाबीच व्यसन आपल्याला जडता कामा नये एवढी माफक काळजी तर प्रत्येकाने घेतली पाहिजे.कुटुंब समाज आणि स्वतः व्यक्ती, पर्यायाने देश या सर्व घटकांवर एकाच वेळी प्रभाव करून कौटुंबिक सामाजिक व व्यक्तिगत स्वास्थ्य बिघडणारा एकमेव विघातक आजार व्यसनाधीनता हि किडच आहे एकदा लागली कि पर्याप्त नुकसान केल्या शिवाय नष्ट होत नाही. सामाजिक पातळीवर असतील अथवा कौटुंबिक पातळीवर व्यसनाधीनतेचे परिणाम हे विघातक असतातच.व्यसनाधीनता हि किड सहजासहजी दुर्लक्षित करून चालणार नाही. सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी हि किड मुळासह संपुष्टात येण गरजेच आहे. आयुष्याची , कुटुंबाची,समाजाची देशाची दुरवस्था होऊ देयची नसेल तर या भयानक किडी पासून आपल्याला आपलं स्वतःचं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण करता आलाच पाहिजे.आणि संरक्षण करत असताना आपण व्यापक जनजागृती करत इतरांना सुद्धा यापासून दूर राहण्यासाठी जे जे काही शक्य होईल असं योगदान दिले पाहिजे.अज्ञान हेच कोणत्याही व्यसनाधीनतेच मुळ असतं . आपल्यावर आध्यत्मिक ज्ञानाचा प्रभाव असले ,सत संगत असेल .तसेच नियंत्रित मर्यादित जीवनशैलीचा अंवलब असेल तर कोणत्याही विघातक बाबीचा आपल्या जीवनशौलीवर व आपल्यावर फार काही उल्लेखनीय परिणाम होणार नाही तसंच यत्किंचितही आपलं अहित होणार नाही.दैनदिन जीवन जगत असताना सुख दुःखांच्या सीमारेषेवर असणार्या प्रत्येक बाबीचा आनंद घेत असताना किंवा दुःखांचा अघात झेलताना मनाला दुबळ करुन व्यसनाच्या आहारी जाऊ देऊ नये हिच आध्यत्मिक ज्ञानाची शिकवण आहे . जीवनातील अनेक बाबी आपल्या मनाविरुद्ध घडल्या तरी सुद्धा आपण आपलं जीवन प्रभावित होऊन वाम मार्गाने जाऊ दिलं नाही पाहिजे तसेच कोणत्याही व्यसनाचा आधार न घेता स्वतःला मजबूत केल पाहिजे.पण विद्यमान परस्थिती मध्ये समाजात जी व्यसनाधीनता वाढली आहे त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही उलटपक्षी प्रत्येकाने लक्ष देवून हे प्रमाण कमी कस करता येईल.आणि शेवटी व्यसनाधीनता संपुष्टात कशी येईल यासाठी प्रयत्न करण गरजेचे आहे.हि प्रत्येकाची राष्ट्रीय जबाबदारी आणि कर्तव्य आहे. स्वतःला यापासून अलग करण म्हणजे सामाजिक नुकसान करण्या सारख आहे. त्या साठी चांगल्या सवयी लावा ,चांगली संगती करा वाईट लोकांचा विचारांचा प्रभाव आपल्यावर होऊ न देता स्वतःला सदैव सकारात्मक ज्ञान मार्गावर असु तर सर्व विकारांवर प्रभावी उपाय असुन कोणतही व्यसन आपल्या आजूबाजूला फिरकणार नाही जर आपण स्वतःला सदैव सकारात्मक ज्ञान मार्गावर मार्गस्थ ठेवलं तर आपण आपला बचाव व्यसनाधीनतेपासुन करू शकतो . व्यसनाधीनता हि किड मुळासह संपुष्टात आणुन निर्व्यसनी समाज रचना निर्माण करणं हे प्रत्येकाच व्हिजन असलं पाहिजे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301