
दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर -मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर येथे
दिनांक ६ मे २०२३ शनिवार रोजी तिवारी मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे रेखाचित्र शाखेची सर्वसाधारण सभा झाली .. या सभेला संपुर्ण महाराष्ट्रातील जलसंपदा विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग,भुजल सर्वेक्षण विभाग , पाणीपुरवठा, शासकीय मुद्रणालय, इतर असे अने क विभागातील रेखाचित्र आरेखक संवर्गाचे सर्व जिल्हा शाखा पदाधिकारी , सेवानिवृत्त तसेच कार्यरत सदस्य , संघटनेचे माजी जेष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .. कार्यक्रमाचा शुभारंभ भुजल सर्वेक्षण ची कर्मचारी श्रीमती दिपाली खोबरे व इतर सहकार्यांच्या राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या समुह गायनाने झाला.. केंद्रीय अध्यक्ष श्री जकी जाफरी यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले… रेखाचित्र संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष श्रीमती विणा ठाकुर यांनी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री जकी जाफरी यांचा पुष्पगुच्छ देउन सत्कार केला.. तसेच सर्व सन्माननीय केंद्रीय पदाधिकार्यांचा छ.छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.. संघटनेचे सरचिटणीस श्री सुधीर गभणे यांना मागील सभेच्या इतिवृत्ताच्या अहवालाचे वाचन केले.. कोषाध्यक्ष श्री श्रीकृष्ण आपटे यांनी मागील पाच वर्षातील लेखापरिक्षण अहवालाचे वाचन केले.. संघटनेचे मावळते अध्यक्ष श्री जाफरी यांनी संघटनेच्या मागील पाच वर्षाच्या कालावधीतील संघटनेने केलेल्या दैदिप्यमान कार्याविषयी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सविस्तर माहिती सर्व उपस्थितांना दिली.. संघटनेने मागील पाच वर्षात विवीध विषयांवर संघटनेने संपादित केलेल्या अवगत केलेल्या यशस्वी कारकिर्दीबद्दल विस्तृत कथन केले.. दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटनेची पुढील पाच वर्षा करीताची नवीन कार्यकारीणी निवडण्याची प्रक्रीया सुरु झाली …महाराष्ट्रातुन आलेल्या जिल्ह्यातील अनेक इच्छुक सदस्य उमेदवारांनी आपले नामनिर्देशन भरले .. या नवीन कार्यकारीणी निवड प्रक्रीयेसाठी श्री राजेंद्रकुमार खाजेकर यांनी निर्वाचन अधिकारी म्हणुन काम पाहीले.. नुतन कार्यकारीणीची निवड हि सभागृहात आवाजी बहुमताने करण्यात आली…वर्ष २०२३ ते २०२८ या पुढील कालावधीच्या संघटन कार्यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री जकी अहेमद जाफरी यांचीच दुसऱ्यांदा केंद्रीय अध्यक्ष म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली… उपाध्यक्ष पदासाठी श्री राहुल साळुंके पुणे व श्री रविंद्र बिंड अमरावती यांची निवड झाली तसेच सरचिटणीस पदी श्री सुधीर गभणे नागपुर , श्री विनायक जोशी लातुर अतिरिक्त सरचिटणीस , श्रीमती वंदना परिहार नागपुर कोषाध्यक्ष , श्री अमोल सुपेकर अहमदनगर सहकोषाध्यक्ष , श्रीमती स्वाती डोकबणे नाशिक व श्रीमती दिपाली खोबरे भुजल सर्वेक्षण ,औरंगाबाद यांची महिला प्रतिनीधी निवड झाली… विभागीय सचिव पदासाठी औरंगाबाद विभागकरीता श्री मोसिक परभणी व लातुर विभागासाठी परळीचे विनोद मिसाळ तसेच अकोला साठी वाशिमचे श्री सतीश पारणकर ,अमरावती विभागासाठी श्री सचिन गुरुडे , नागपुर विभागासाठी श्री प्रशांत कहाते ,चंद्रपुर विभागाकरीता श्री शशीकांत अक्केवार ,नाशिक विभागा करीता धुळे चे श्री जिभाउ बच्छाव ,पुणे विभागाकरीता नगरचे श्री हाफीज शेख यांची निवड झाली… महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटनेच्या नवीन नवनिर्वाचित कार्यकारीणीच्या पुढील पाच वर्षाकरीता विजयी पदाधिकार्यांची निर्वाचन अधिकारी श्री राजेंद्रकुमार खाजेकर यांनी घोषणा केली व त्यांचेच हस्ते सर्व विजयी उमेदवारांचा पुष्पगुच्छे शाल व फेटे बांधुन मोठ्या जल्लोषात सत्कार करण्यात आला .. या संपुर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जवाबदारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेने यथोचित पार पाडली ..या सभेच्या व निवडणुक कार्यक्रमासाठी जिल्हा शाखेच्या अध्यक्षा श्रीमती विणा ठाकुर,श्री एस.एम .नाईक ,श्री वाय .ओ.पठाण ,श्री अहेमद, श्री के.के.जाधव,श्री भुसावळकर,श्री परळीकर,श्री पाडवी,श्री संतोष मते ,श्री कोकाटे ,श्री प्रमोद राव , श्री जनार्धन शेरे श्री पालकर,श्री वसंत सोनवणे इत्यादी अनेक रेखाचित्र संवर्गाच्या आजी माजी सदस्यांनी मोठ्या हिरारीने सहभाग घेउन या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले… या कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्र संचलन भुजल सर्वेक्षण च्या श्रीमती दिपाली खोबरे यांनी केले… राष्ट्रगीतानंतर संघटनेचा दिवसभराचा कार्यक्रम संप्पन्न झाला…. श्री राजेंद्र करपे यांनी कार्यक्रम संप्पन्नतेनंतर आभार प्रदर्शन सादर केले….