
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबई संचालित वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा. महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद(NAAC) या संस्थेचा बी++ दर्जा प्राप्त झाला .
महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना त्या महाविद्यालयाची गुणवत्ता बघितली जाते तसेच त्या महाविद्यालयामध्ये कोणत्या दर्जाचे शिक्षण दिले जाते हे तपासले जाते याबाबतचे मुल्याकंन बंगलुर येथील NAAC या राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडुन केले जाते.याबाबतचे मुल्याकंन करण्यासाठी तीन सदस्यांच्या समितीने दिनांक २६ जून आणि २७ जून २०२३ रोजी म्हसळा येथील वसंतराव नाईक कला ,वाणिज्य आणि बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली या समितीमध्ये अध्यक्ष म्हणुन .श्री शंकराचार्य विद्यापीठ कलाडीचे माजी कुलगुरू मा.श्री डॉ.एम.सी.दिलीप कुमार समितीचे समन्वयक म्हणुन म्हैसूर विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ.वाय.एच नायकवाडी आणि सदस्य म्हणून पिलवाई कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजयकुमार शहा याचां समावेश होता या समितीने वेगवेगळ्या सात कसोट्याच्या आधारावर म्हसळा महाविद्यालयाचे मूल्यांकन केले आणि त्यासंबंधीचा अहवाल बंगलुर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद(NAAC) या संस्थेला सादर केला त्रिस्तरीय समितीने प्रत्यक्ष पाहणी करुन सादर केलेला अहवाल आणि महाविद्यालयाने सादर केलेला एस.एस.आर यांच्या आधारावर महाविद्यालयाचे मुल्याकंन करून दिनांक १९ जुलै २०२३ रोजी महाविद्यालयाला बी ++ हा दर्जा जाहीर करण्यात आला.महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या या सुयशा बद्दल महाविद्यालय विकास समितीचे विश्वस्त सचिव प्रतिनिधी मा.श्री.फजल हळदे,सदस्य मा.श्री.महादेव पाटील,सदस्या मा.श्रीमती निलम वेटकोळी,सदस्य मा.श्री.योगेश विचारे,महाविद्यालय प्रभारी प्राचार्य श्री. डी.ए.टेकळे,नॅक समन्वयक प्रा.श्री.सुरेश दुंडे तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनीचे कोकण उन्नती मित्र मंडळाचे मा. अध्यक्ष श्री.मुश्ताक अंतुले साहेब, सचिव मा.श्री. अशोक तळवटकर साहेब ,खजिनदार श्रीमती वंदना विचारे मॅडम, मा.डॉ.श्री.महम्मद अंतुले यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.महाविद्यालयात तील सर्व घटकांचे अभिनंदन करताना
कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांनी सांगितले की,आपण सर्वांनी घेतलेल्या कठोर परीश्रमामुळे महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनाचा बी++ दर्जा मिळाला आहे. यापुढे देखील महविद्यालयाची सर्वागीण प्रगती करून ह्या ग्रेड पेक्षा पुढील ग्रेड कशी मिळेल याकरिता आपल्याकडून जेवढी मेहनत घेता येईल तेवढी आपण सर्वजण मिळून घेऊआणि अंतुले साहेबांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी कार्यरत राहुया.