
लोहा कंधार मतदारसंघात विस दिवसांत दुष्काळ जाहीर न झाल्यास जलसमाधी आंदोलन करणार…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – उध्दव बाळासाहेब ठाकरे ( गट ) शिवसेनेच्या वतीने मंगळवारी सकाळी बारा वाजता लोह्यातील मुख्य भाजी मंडई परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दरवर्षीपेक्षा या वर्षी पाऊस कमी झाला शेतकऱ्यांना पहिल्यांदा पेरणी केली पाऊसच झाला नाही तर बळीराजाच्यावर या वर्षी दुबार व तिनबार पेरणीचे संकट निर्माण झाले हे सर्व झाले असताना सुद्धा आता पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके सुकुन करपुन जात आहेत तर काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने लोहा कंधार तालुक्यात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या सर्व बाबींचा विचार करता बळीराजा अर्थिक संकटात अडकलेला असुन या मतदारसंघातील लोकप्रिय कुंभकर्ण झोपेत असल्याची टिका हि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पा मोरे यांनी केली.
लोहा कंधार तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा अन्यथा शेतकऱ्यांना गांज्या लावण्याची परवानगी द्या येत्या विस दिवसांत लोहा कंधार तालुका दुष्काळग्रस्त झाला नाही तर लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील धरणात जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे युवा नेते बाळासाहेब पाटील जाधव सुनेगांवकर यांनी दिला आहे .
बळीराजाच्या आडी अडचणींना तोंड न देणारे व मतदासंघात वाढदिवसाच्या देखावा करत फिरणारे जनसामान्यांच्या आडचणी न सोडवणाऱ्यांना येणाऱ्या रेडाचं सोगं करून झोपणाऱ्या लोकप्रतिनिधीवर बळीराजाच्या आडवा नांगर फिरविल्याशिवाय राहणार नाही अशी या आंदोलनात सडकून टीका शिवसेना नेते बाळासाहेब जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर केली .
लोहा कंधार तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा या मुख्य मागणीसाठी शिवसेना नेते बाळासाहेब पाटील जाधव सुनेगावकर यांच्या नेतृत्वाखाली लोहा कंधारच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लखन मोरे, युवासेना विधानसभा प्रमुख बालाजी गाडेकर, अंगद पाटील, प्रकाश मामा, वैभव पाटील, पाडाजी गाडेकर, अमोल जाधव, सरपंच शंकर गिरी, दत्ता पाटील, जकवाड, रवि पाटील, शैलेश ढेंबरे, बालाजी नामपल्ले, शंकर यरमुनवाड, विशाल जाधव, , मारोती जाधव सह आदी शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.