
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास…
दै.चालु वार्ता वृत्तसेवा
नांदेड (कंधार):- कंधार तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुक २०२३च्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी /शिवसेना /राष्ट्रवादी युतीचे बळीराजा परिवर्तन पॅनल माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली माननीय हरिहररावजी भोसीकर माननीय आनंदरावजी बोंढारकर. आमदार तुषार भाऊ राठोड ,माननीय लोहा कंधार मतदार संघाचे भावी आमदार प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शना खाली शिवकुमार भोसीकर ,अॅड मारोती पंढरे व तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व सर्व उमेदवार प्रचारार्थ गावोगावी भेट देत असताना गावोगावी सेवा सहकारी सोसायटी , ग्रामपंचायत मतदार संघातील मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर करत आहेत . तिन पक्षाच्या युतीमुळे आणि खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या व प्रविण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास असल्यामुळे वाढता पाठिंबा दिला जातो आहे.