
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी प्रवीण पवार:-9923531092
दौंड. दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण रस्ता सुरक्षा अभियान 35 वे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.
त्यादरम्यान वाहतुकीचे नियम हे नेहमीच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, सोयीसाठी बनवलेले असतात. मग तो नियम दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याचा असो अथवा कारच्या खिडक्या बंद करून सिगारेट पिण्याबात असो. नागरिकांच्या काळजीपोटी बनवलेले हे नियम वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवतात. अनेकदा वाहतूक विभागाने जारी केलेल्या नियमांना नागरिकांकडून विरोध देखील होतो. तर काही वेळा अशा नियमांचं नागरिकांकडून सक्तीने पालन करुन घेतलं जातं. सिग्नलवरील लाल दिवा पेटला की गाडी थांबवणे आणि सावकाश वाहन चालवणे केवळ इतके आणि असेच नियम नाहीत, तर नागरिकांना शिस्त लागावी यासाठी शेकडो नियम वाहतूक विभागाने लागू केले आहेत हे सर्व नियम व अटी पोलिस अधिकारी ASI चौधरी , ASI जाधव, PC पाटील, PC घोडके यांनी असे रस्ता सुरक्षा सप्ताह च्या अनुषंगाने नगरमोरी मदर तेरेसा चौक येथे वाहन सुरक्षित चालण्याच्या अनुषंगाने प्रबोधन केले…