दै.चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर
पिकांना पाणी देत असताना उंदराच्या बिळातून पाणी शेजार च्या शेतात गेल्याच्या कारणा वरुण चुलता पुतण्यात हाणामारी झाल्याची घटना दि. 16 जानेवारी रोजी पैठण तालुक्यातील ईस्माईलपुर शिवारात घडली आहे.
फिर्यादी गणेश अंकुश गायके वय 28 रा. कर्हे टाकळी ता. शेवगाव यांचे इस्लामपूर शिवारात गट नं 21 मध्ये शेत असून ते गव्हाच्या पीकाला पाणी भरत होते. ऊंदराने केलेल्या बिळातून पाणी शेजारी असलेल्या शेतात गेले. त्या वरुण आरोपी सोमनाथ त्रिंबक गायके, आनंद सोमनाथ गायके, नंदाबाई सोमनाथ गायके रा. कर्हे टाकळी ता. शेवगाव यांनी संगनमताने फिर्यादी व साक्षीदार यांना आरोपी आनंद गायके याने गाल, पाठ, व छातीवर लाथा बुक्क्याने मारहाण करत व चावा घेत डाव्या पायावर दगड मारुन नख काढले, सोमनाथ गायके व नंदाबाई गायके यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तक्रारी वरुण पोलीस ठाणे पैठण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री ओहळ तपास करीत आहे.