
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर):कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरने मुख्य बाजार इंदापूर येथील अद्यावत मार्केटमध्ये इंदापूर कृषी महोत्सव-२०२४ अंतर्गत बुधवार दि. २४ जानेवारी २०२४ ते रविवार दि. २८ जानेवारी-२०२४ दरम्यान पाच दिवसीय कृषी, पशु-पक्षी, जनावरे, मत्स्य प्रदर्शन व डॉग शो तसेच पुणे जिल्हातील एकमेव घोडे बाजाराचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केलेले आहे. कृषी प्रदर्शनाचे भुमिपुजन समारंभ बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहित मोहोळकर, आमदार यशवंतराव माने व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते बुधवार दि. १७/०१/२०२४ रोजी पार पडला.
कृषी प्रदर्शन व घोडे चाल स्पर्धा उद्घाटन समारंभ बुधवार दि. २४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०२.०० वा. तर कृषी प्रदर्शन समारोप, बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. संपन्न होणार आहे. या कृषी प्रदर्शनास सोनाई डेअरी, नेचर डेअरी व पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या., पुणे हे सहप्रायोजक आहेत.
बाजार समितीचे “इंदापूर कृषी महोत्सव-२०२४” अंतर्गत कृषी प्रदर्शनात शेती उत्पादने, बी-बियाणे, शेती औजारे- साधने, ऑटो मोबाईल्स, गृहउपयोगी आवश्यक वस्तु तसेच शेती/कृषी अनुशंगिक यांत्रिक साहित्य याबाबतचे कृषी प्रदर्शन २५० स्टॉल, ५० खाद्य स्टॉल, पशु-पक्षी, जनावरे प्रदर्शन आणि घोडे बाजार तसेच घोडे चाल (रवाल), नाचकाम स्पर्धा शिवाय स्मार्ट घोडे नर-मादी, नुकरा, मारवाड, काटेवाडी, सिद्धी हे घोडे बाजाराचे प्रमुख आकर्षण आहे. तर “डॉग शो” प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व पुरुष-मुलांसाठी “महाराष्ट्राची लोककला” हा कार्यक्रम तसेच मुली- महिलांसाठी सौ. मोनाली करंदीकर यांचा “फुल टु धमाल” व “खेळ पैठणीचा” हा सुप्रसिद्ध कार्यक्रम आयोजीत केलेला आहे. लहान व प्रौढांसाठी “मनोरंजनाचे खेळ” व खवय्यांसाठी “खाऊगल्ली” असे शिस्तबद्ध नियोजन केले जाणार असुन इंदापूर कृषी प्रदर्शनात रु. १ कोटीची ऑफर असणाऱ्या २ टनाचा “गजेंद्र रेडा” नाविन्यपूर्ण आकर्षण तर शेतकऱ्यांसाठी ड्रोन यंत्र सामुग्री स्टॉल असणार आहे.तसेच चालु वर्षी नव्याने अश्वरोहनातील ऑलम्पीक क्रिडाप्रकार प्रात्यक्षिके, महाराष्ट्र लोककला, बुलेट रायडींग असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.
यावेळी बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहीत मोहोळकर, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, संचालक आमदार यशवंत माने,दत्तात्रय फडतरे,मधुकर भरणे,संग्रामसिंह निंबाळकर,मनोहर ढुके,संदिप पाटील,रुपालीताई संतोष वाबळे, मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव,संतोष गायकवाड,अनिल बागल,दशरथ पोळ, रोनक बोरा,सुभाष दिवसे व प्रभारी सचिव संतोष देवकर उपस्थित होते.