
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
हडपसर पुणे : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणा ई- टेक्नो स्कूल मध्ये ‘स्पेस ऑन व्हिल ‘ या बस प्रदर्शनाचे आयोजन दि २६ व २७ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री विठ्ठल राजगावकर नेहरु सायन्स पार्क, मुंबई , मिनाताई मालगावकर, विज्ञान भारती , मयांक बडगूजर , विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र , उद्योजक राहूल तुपे तसेच विद्यालयाचे डीजीएम सतीश दासारी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
या प्रदर्शनाद्वारे इस्त्रोची माहिती, इस्त्रोच्या विविध मोहीमा , इस्त्रो मार्फत अंतराळात होणारे विविध संशोधन या विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना मिळाली . या प्रदर्शनामुळे भावी अंतराळ संशोधक होण्याची बीजे विद्यार्थ्यांच्या मनात रोवली गेली. प्रदर्शनास परिसरातूनही पालक वर्ग व विद्यार्थी याचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला .मुख्याध्यापिका सौ. शालिनी दुबे, एजीएम सौ. अश्विनी सावळे, उपमुख्याध्यापिका सौ रीना देशमुख, ॲकेडमीक डीन सौ. सुनिता वट्टीकुट्टी यांनी सर्वाचे आभार मानले .