
प्रचारात विकासाचे मुद्दे दुर्लक्षितच
दै चालु वार्ता प्रतिनिधी
वाशिम/रिसोड
भागवत घुगे
रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. प्रचारात एकमेकांवर टीका-टिपण्णी व आरोप-प्रत्यारोपाचा वर्षाव होऊ लागला आहे. परिणामी मालेगाव रिसोड मतदारसंघातील या गोंधळात विकासाचे मुद्दे पूर्णतः दुर्लक्षित होत आहेत. ज्या मतदारांच्या जीवावर नेते आमदारकीची स्वप्ने पहात आहेत. त्याच मतदारांच्या समस्यांवर नेतेमंडळी बोलायला तयार नाहीत असेच चित्र प्रचार सभेत पहायला मिळत आहे.
आजही रिसोड तालुक्याच्या विकासाची चर्चा करायची झाली तर रस्ते, वीज, पाणी हेच प्राथमिक मुद्दे जनते समोर आहे. अद्यापही याच मुद्द्यांची पूर्णतः सोडवणूक करण्यात नेतेमंडळींना यश आलेले नाही. मोप मोहजाबंदी रस्ता अनेक या गावां दरम्यान
लोकांचे समाधान नाही
गेल्या अडीच-तीन वर्षांत तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाल्याचे बह सागितले दर्जाबाबत अतिक्रमणे दर्जाहिन विकासकामे, कचऱ्याचा प्रश्न, क्रीडा संकुल, वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र आदी शहरांतील प्रश्न, तर उमेदवारांना माहिती आहेत की नाहीत. हाच एक प्रश्न आहे.
सकारात्मक प्रचार गरजेचा
उमेदवारांनी आता गावागावात प्रचारदौरे सुरू केले आहेत. त्यातील त्यांच्या भाषणांमध्ये विकासाचे मुद्दे कमी अन् एकमेकांची उणीदुणीच काढण्यातच अधिक धन्यता मानत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रत्यक्षात नेतेमंडळींनी विकासाचे मुद्दे हाती घेऊन निवडणुकीत सकारात्मक प्रचार करीत मतदारांना प्रभावित करणे अपेक्षित आहे.
रोजगाराच्या संधी पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध करू शकले नाही. किंवा औद्योगीक क्षेत्रात मोठी कंपनी आणु शकले नाही.
रिसोड तालुक्यातील मांडवा जवळा मोहजाबंदी मध्ये पाणीप्रश्न, अनेक वर्षापासून वंचित आहेत
प्रचाराची
ढासळते निवडणुकीत सोशल
मीडियावरील प्रचाराची पातळी दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. स्वतःच्या नेत्याच्या सकारात्मक बाजू मांडण्यापेक्षा विरोधी नेत्यावर जहरी टीका करण्यासाठीच सोशल मीडियाचा अधिक वापर होत असल्याचे तालुक्यातील चित्र आहे.
मतदारसंघातील विविध जल जिवन रस्ते सभामंडप निकृष्ठ बांधकामे, आहे . शहरातील अन्य विविध समस्या असे हे प्रश्न तर रिसोड वेगळेचआणि
येथे पाण्यावर दरवर्षी संघर्ष ठरलेला. शहरांसह ग्रामिण क्षेत्रांत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनाकडून कोट्टयावधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या मात्र अडथळ्यांच्या शर्यतीमूळे नागरीकांच्या तोडांतील पाणी पळाले मंजूर पाणी पुरवठा योजनांची बांधकामे पुर्ण होण्याचा कार्यकाळ दोन ते अडीच वर्षांपासुन संपला तरी पण योजना पुर्ण होईनात जो पर्यंत योजना पुर्ण होत नाही तोपर्यंत रिसोड
आणि मालेगाव च्या पाणीप्रश्नावर तोडगा निघणे कठीण आहे. तालुक्यातील नेते पाणीप्रश्नाबाबत गंभीर नसल्याचेच वारंवार दिसून आले आहे. उलट पाणीप्रश्नाच्या निमित्ताने एकमेकांवर चिखलफेक करण्याची संधी साधून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात अशीच जनभावना तयार झाली आहे.