
अमेरिकेत पोहोचताच नरेंद्र मोदींनी घेतली त्यांची भेट..
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज रात्री (13 फेब्रुवारी) व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे भव्य स्वागत केले जाईल.
यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होईल. त्यांनी अमेरिकेच्या अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली आहे.
ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर नरेंद्र मोदींची ही त्यांची पहिलीच भेट असेल. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिनिधीमंडळ स्तरावरील अनेक बैठकाही होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी एलोन मस्कसह अनेक आघाडीच्या व्यावसायिक नेत्यांनाही भेटणार आहेत.
तुलसी गॅबार्ड यांची घेतली भेट
अमेरिकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि गॅबार्ड यांनी भारत-अमेरिका यांच्यातील मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा केली.
तुलसी गॅबार्ड यांच्याबद्दल माहिती
राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या प्रभारी असलेल्या तुलसी गॅबार्ड ह्या लष्करी अधिकारी राहिलेल्या आहेत. त्यांनी इराक आणि कुवेतमध्ये काम केले आहे. त्यांनी अमेरिकेतील हिंदूंचे प्रश्न जोरदारपणे मांडले आहेत.
त्या भारतीय वंशाच्या नाहीत
तुलसी गॅबार्ड स्वतःला हिंदू म्हणतात. मात्र, त्या भारतीय वंशाच्या नाहीत. त्यांची आई कॅरोल ह्या हिंदू धर्मांतरित आहेत, तर वडील रोमन कॅथोलिक ख्रिश्चन होते. हिंदू धर्माच्या प्रभावामुळे कॅरोल यांनी त्यांच्या मुलांची हिंदू नावे ठेवली होती.
तुलसी झाल्या रिपब्लिकन पक्षात सामील
2022 मध्ये तुलसी गॅबार्ड डेमोक्रॅटिक पक्ष सोडून रिपब्लिकन पक्षात सामील झाल्या होत्या. निवडणूक चर्चेत हॅरिसला पराभूत करण्यासाठी ट्रम्प यांनी तुलसीची मदतही मागितली होती. तुलसी गॅबार्ड यांचा जन्म अमेरिकेत झालेला आहे. त्यांचे वडील सामोअन आणि युरोपियन वंशाचे आहेत. हिंदू धर्मात रस असल्याने त्यांनी मुलीचे नाव तुलसी ठेवले होते.
अमेरिकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
अमेरिकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर लिहिले की, “मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यास आणि भारत-अमेरिका जागतिक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यास उत्सुक आहे. आपला देश आपल्या लोकांच्या हितासाठी आणि आपल्या ग्रहाच्या चांगल्या भविष्यासाठी एकत्र काम करत राहतील.
भारतीय समुदायाच्या लोकांशी साधला संवाद
विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर, पंतप्रधान मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अतिथीगृह असलेल्या ब्लेअर हाऊस पोहोचले. यावेळी त्यांनी भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद साधला. मोदी तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर अमेरिकेत पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये झालेल्या एआय समिटला उपस्थित होते.