
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
सी. बी एस. ई.१०वी वर्ष २०२४-२५ च्या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेठाण, चाकण शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाचे शिखर गाठले.विद्यालयातून या वर्षी ११६ विद्यार्थी इयत्ता १०वी च्या परीक्षेसाठी बसले होते.त्यापैकी गौरी झोरे या विद्यार्थिनीने ९८.६०%गुण मिळवून स्कूल टॉपर होण्याचा मान मिळविला.त्याखालोखाल सानवी मांडेकर या विद्यार्थिनीने ९८.४०%गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.मनस्वी गावंडे हिला ९८.२०%,आदित्य ठोंबरे ह्याला ९७.४०%,श्रेया वांधेकर हिला ९७.२०%,श्रुती मेदनकर
हिला ९७.२०%,निर्भय सिंग ह्याला ९६.८०%, हेत आर्यन ह्याला ९६.००%,शौर्य पवार ह्याला ९६.००%, रीषित दावडा ह्याला ९५.८०%, आकाशा कसबे हिला ९५.६०%, अनुष्का निखारे हिला,९५.२०%, आदित्य गव्हाणे ह्याला ९५.२०%गुण मिळाले.
इंग्रजी विषयामध्ये गौरी झोरे या विद्यार्थिनीने १०० पैकी १०० गुण,मराठी विषयामध्ये श्रुती मेदनकर ह्या विद्यार्थिनीने १००पैकी १०० गुण, संस्कृत विषयामध्ये गौरी झोरे, सानवी मांडेकर,मानसी गावंडे,श्रेया वांधेकर, आकाशा कसबे या विद्यार्थिनींनी १००पैकी १०० गुण तसेच इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये गौरी झोरे, सानवी मांडेकर,मानसी गावंडे,आर्या आवारी या विद्यार्थिनींनी व निर्भय सिंग या विद्यार्थ्याने १००पैकी १०० गुण , हिंदी विषयात रीषित दावडा या विद्यार्थ्याने १००पैकी ९६ गुण, तसेच पूजा प्रजापती,सृष्टी झा या विद्यार्थिनींनी १०० पैकी ९६ गुण , विज्ञान विषयात हेत आर्यन या विद्यार्थ्याने १००पैकी ९९ गुण,गणित विषयात आदित्य ठोंबरे या विद्यार्थ्याने१०० पैकी ९९ गुण ,सामाजिक विज्ञान विषयात अनुश्री पवार ह्या विद्यार्थिनीने १००पैकी ९९ गुण मिळवत राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला.
विद्यालयातील इतर विद्यार्थीही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सिमरन कौर व उपप्राचार्या सौ.गोमती कौशिक यांनी आनंद व्यक्त केला.त्यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.आगामी काळात पालक व शिक्षक ह्यांच्या सहकार्याने विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य अशाच प्रकारे चालू राहील असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला.