
डोनाल्ड ट्रम्प यांची टीम कूकला धमकी !
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा संकल्प केलेला आहे. यासाठी ते वेगवेगळे मार्ग वापरुन पाहत आहेत. जगभरातील विविध देशांना टॅरिफचा दणका देऊन त्यास पुन्हा 90 दिवसांची स्थगिती देणाऱ्या ट्रम्प यांनी ट्र्थवरील सोशल अकाऊंटवरुन मोठी घोषणा केली आहे.
अमेरीकेचे अध्यक्ष डोलान्ड ट्रम्प यांची ॲपलला धमकी दिली आहे. आयफोनचं अमेरिकेबाहेरील उत्पादन थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत आयफोन तयार न केल्यास 25 टक्के टॅरिफसाठी तयार राहण्याचा इशारा देखील दिला आहे.
आयफोनचे अमेरिकेत उत्पादन न केल्यास कमीतकमी 25 टक्के कर लावला जाणार असल्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी टीम कूकला दिली आहे. याआधी साऊदीच्या दौऱ्यावर ट्रम्प असताना भारतात आयफोन न बनवता अमेरिकेत बनवण्यासाठी टीम कुक यांना इशारा दिला होता.
अमेरिका सोडून भारत किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी आयफोनची निर्मिती करत अमेरिकेत विकल्यास कमीतकमी 25 टक्के कर लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
भारतात आयफोन बनवाल तर याद राखा
मी बऱ्याच दिवसांपूर्वी ॲपलच्या टीम कुकला कळवलं होतं की त्यांनी आयफोनची निर्मिती अमेरिकेत करुन अमेरिकेत विक्री करावी. भारतात नव्हे किंवा इतर कुठल्या ठिकाणी. जर, असं होणार नसेल तर ॲपलला 25 टक्के ट्ररिफ अमेरिकेला द्यावं लागेल. धन्यवाद, या मुद्याकडे लक्ष दिल्याबद्दल आभार, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ॲपलच्या टीम कूक यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी टीम कूक यांना “भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही, भारताला स्वतःचं पाहूद्या.” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. कुक अमेरिकेत आणखी प्लांट्स उभारण्याचा विचार करत आहेत. हे ॲपलच्या याआधीच्या $500 अब्ज गुंतवणुकीच्या वचनाशी सुसंगत आहे.
डोनाल्ड ट्रम्प नवा प्रस्ताव आणणार
अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प वन बिग ब्यूटीफूल बील आणणार आहेत. त्यानुसार अमेरिकेतील ऊर्जा कंपन्यांना ग्रीन एनर्जीसाठी दिलेलं अनुदान बंद केलं जाईल. याचा परिणाम अमेरिकेत वीज महागण्यावर होणार आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील विविध देशांवर आकारलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे.
दरम्यान, ॲपलचे टीम कूक डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर काय धोरण असणार हे पाहावं लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर ॲपलच्या भूमिकेकडे उत्सुकता लागली आहे.