
खासदार नीलेश लंके यांनी स्पष्टच सांगितलं…
अहिल्यानगर ते संभाजीनगर या रेल्वेमार्गाच्या कामास लवकरच मंजूरी मिळणार असून राहुरी ते शिंगणापुर या रेल्वेमार्गास केंद्र सरकारने मंजुरी देऊन त्यासाठी ४९४ कोटी रूपये निधीची तरतुदही करण्यात आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.
खासदार नीलेश लंके यांनी रेल्वे विधेयकावरील चर्चेमध्ये भाग घेत अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या रेल्वेमार्गाची आग्रही मागणी केली होती. त्यामुळे हा रेल्वेमार्ग केवळ नकाशावर नाही तर प्रत्यक्ष साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा मार्ग या मार्गावरील विविध तिर्थक्षेत्रांना भेट देणारे भाविक तसेच पर्यटकांबरोबर औद्योगीक विकासला चालना देणारा ठरणा आहे.
रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शिंगणापुर दरम्यानच्या २१.८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गास मंजुरी देत त्यासाठी ४९४.१३ कोटी रूपयांच्या निधीचीही तरतुद करण्यात आली आहे. या मार्गाचे काम लवकरच सुरू होऊन भाविक, स्थानिक प्रवासी, पर्यटकांना या मार्गाचा लाभ होणार आहे.
अहिल्यानगर ते संभाजीनगरची घोषणा लवकरच
अहिल्यानगर ते संभाजीनगर हा रेल्वेमार्ग सर्वेक्षणाच्या टप्प्यातून पुढे सरकला असून लवकरच या मार्गाचे काम सुरू होणार आहे. हा मार्ग ८४ किलोमीटरचा असून वाळुंज, नेवासा फाटा, देवगड, राहुरी, शिंगणापुर व वांबोरी मार्गे नगरला जोडणार आहे.
खा. लंके यांचा पाठपुरावा
खासदार नीलेश लंके यांनी या मागणीसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांशी सतत पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात राहुरी शिंगणापुर या रेल्वेमार्गास मंजुरी मिळाली असून लवकरच अहिल्यानगर संभाजीनगर या रेल्वे मार्गालाही मंजुरी मिळणार आहे.
राहुरी-शिंगणापुरसाठी ४८३ कोटी
राहुरी- शिंगणापुर या रेल्वे मार्गासाठी ४८२.९३ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला असून २१-८४ किलोमीटरच्या या मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. मंजुर निधीपैकी स्थापत्य कामांसाठी ४०६.३३कोटी, सिग्नल व दूरसंचार यंत्रणेसाठी ४२.२१ कोटी, विद्युत कामांसाठी ३४.१९ कोटी रूपांची तरतुद करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाचे संचालक अभिषेक जगावत यांनी ही माहिती दिली.