
यावर शिक्कामोर्तब करणारं उद्धव ठाकरेंच पहिलं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मनसेसोबत युतीची चर्चा सुरू आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करून बोलावे आणि युतीचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे वक्तव्य केले होते.
त्याच्या अवघ्या एका तासातच ‘मातोश्री’वर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी मनसेसोबत युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल. आम्ही संदेश देणार नाही थेट बातमी देऊ. जे काही बारकावे आहेत त्याबाबत आम्ही बोलतोय. शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत.’
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चार महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या सुजाता शिंगाडे यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी माध्यमांशीस संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले.
संजय राऊत यांनी देखील आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हटले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावेल.
…तर राज ठाकरे 100 पावले पुढे येतील
मनसे नेते अविनाश जाधव युतींच्या चर्चेबाबत म्हणाले की, राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी एक काॅल करावा. उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकले तर राज ठाकरे 100 पावले पुढे टाकतील. आम्ही लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावनांचे आदर करतो.