
महायुती सरकार स्थापनेपासून धडाकेबाज निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे पुढे पाहत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’, याप्रमाणे फडणवीसांनी त्यांच्या कामावर भर दिला आहे.
हे करताना ते महायुतीमधील भाजपसह प्रत्येक मंत्र्यांना कारभारावर लक्ष ठेवून आहेत.
वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्यास मागे पुढे पाहत नाहीत. असाच कठोर निर्णय घेत, त्यांनी आपल्याच पक्षातील निकटवर्तीय भाजप मंत्री गिरीश महाजन आणि मत्री राधाकृष्ण विखे यांना दणका दिला आहे. जलसंपदा विभागात 60हून अधिक असिस्टंट ते एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर्सच्या बढत्या आणि बदल्यांच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे.
राज्यातील जलसपंदा विभागाचा कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप मंत्री गिरीश महाजन महाजन आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. सध्या या विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यवाही सुरू आहे. यातच जलसंपदा विभागातील 60हून अधिक असिस्टंट ते एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर्सच्या बढत्या आणि बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारी झाल्या.
याची तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बढत्यांना आणि बदल्यांना तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा निर्णय म्हणजे, आपल्याच पक्षातील निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजनांसह ज्येष्ठ मंत्री विखे पाटलांना दणका असल्याची चर्चा आता रंगली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या जलसंपदामंत्री म्हणून विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदामंत्री म्हणून गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार आहे. कृषी आधारित अर्थव्यवस्था असलेल्या महाराष्ट्रात जलसंपदा हे खाते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या खात्याअंतर्गत शेतकर्यांसाठी अनेक कामे हाती घेतली जातात.
जलसंपदा विभागासाठी मोठी तरतूद
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 2025-26 सालच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागासाठी 15,932 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. त्यामुळेच या विभागात इंजिनिअरपदी वर्णी लागावी, यासाठी अनेकांची धडपड असते. तशी ‘फिल्डिंग’ देखील लावली जाते. यासाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार देखील होत असल्याची चर्चा असते.
कारभाराचे किस्से फडणवीसांच्या कानापर्यंत
राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्याबरोबरच गिरीश महाजन यांचा मनमानीपणा कारभाराचे किस्से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानापर्यंत पोचल्याची चर्चा आहे. यातूनच हा बदली आणि बढत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याचे सांगितले जाते. प्रधान सचिव दीपक कपूर यांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यात लक्ष घालत, मुख्यमंत्र्यांनी अखेर या बढत्या आणि बदल्यांना स्थगिती दिल्याचे समजते.