
एकनाथ शिंदेंचे मंत्री संजय राठोडांचा खळबळजनक दावा !
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार संजय राठोड एकनाथ शिंदेंच्यासोबत गेले. संजय राठोड महाविकास आघाडीत मंत्री असताना पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
ठाकरेंनी त्यांचा राजीनामा देखील घेतला होता. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदेंसोबत गेले आणि पुन्हा मंत्री झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना जलसंधारण विभागाचे मंत्रिपद मिळाले.
शिंदेंसोबत गेलेल्या सर्वच आमदार, मंत्र्यांशी उद्धव ठाकरेंचे तणावाचे संबंध आहेत. त्यांचा उल्लेख ठाकरेंकडून गद्दार असाच केला जातो. मात्र, राठोड यांनी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या बैठकीत मोठा गौप्यस्फोट करत आपले आणि उद्धव ठाकरेंचे संबंध चांगले आहेत. ठाकरे मला आजही फोन करतात, असे सांगितले.
बंजारा समाजाच्या बैठकीत बंजारा भाषेत राठोड यांनी हे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक जाहीर केले होते. त्यामध्ये संजय राठोड नापास झाले होते. त्या संदर्भात बोलातना राठोड म्हणाले, ‘मी एकनाथ शिदेंना बैठकीत उठून सांगितले तुम्ही संजय राठोडला नापास करू शकत नाही. मी तुम्हाला नापास करेल. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो माझे आणि उद्धव ठाकरेंचे संबंध आजही चांगले आहेत. त्यांचे मला आजही फोन येतात.
वक्तव्यानंतर घुमजाव…
संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेंसोबत चांगले संबंध असल्याच्याबाबात केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी त्यांना विचारले असते त्यांनी घुमजाव केले. ते म्हणाले, अशा प्रकराचे मी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्या
संजय राठोड यांनी बैठकीत विधानसभा, लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, असे म्हटले. तसेच राज्यात जिल्हा परिषदेचे बंजारा समाजाचे 500 सदस्य व्हावे यासाठी समाजाने एकत्रित यावे, असे देखील सांगितले.