
मुंब्रा रेल्वे अपघाताच्या घटनेनंतर कळवा-मुंब्रा-दिवा परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी समोर येऊ लागल्या आहे. अनेक वर्षांपासून दिवा लोकल-सीएसएमटी लोकल सुरु करण्याचा नागरिकांची मागणी आहे, मात्र रेल्वेकडून त्याकडे ही दुर्लक्ष केलं जातंय.
तसेच मुब्रां-कळवा दरम्यानच्या जीवघेण्या खांब्यांचा प्रश्न देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, मुंब्रा पार केल्यानंतर कळव्याला जाताना जो बोगता लागतो तिथे तीन पोल अतिशय जवळ आहे. आजवर त्या पोलला धडकून हजार जणांचा मृत्यू झाला असे. अनेक वर्षांची मागणी आहे ते पोल हटवा किंवा बाजूला घ्या. मात्र रेल्वेकडून त्याची साधी दखल घेतली जात नाही.
याशिवाय मागील काही कालावधीत कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील लोकसंख्या जवळपास हजार पटीने वाढली आहे. येथील सर्वच लोक लोकलने प्रवास करतात. मात्र या लोकसंख्येची सोय रेल्वेने कधी पाहिली नाही. आम्ही अनेकदा दिवा लोकल सुरु करावी अशी मागणी केली, मात्र रेल्वेने त्याकडे कानाडोळा केला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
रेल्वेच्या फेऱ्याही वाढवल्या नाही. उलट एसी लोकलमुळे इतर लोकलच्या फेऱ्या कमीच झाल्या. मात्र दिवा लोकल सुरु केल्यास कळवा- मुंब्रा आणि पुढे प्रवाशांवरील ताण कमी होईल. दिवा-मुंब्रा-कळवा येथील नागरिकांची सोय होईल. येथे लोकांना लोकलमध्ये चढायला जागाच नसते. गंभीर अपघात होत असाताना रेल्वेने विचार करणे गरजेचं आहे, असं आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांना केलं आहे.