
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -प्रा. विजयकुमार दिग्रसकर
निवड श्रेणी व वरीष्ठ श्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण गेल्या 10 दिवसांपासून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सुरू होते. अतिशय शिस्तबद्ध, काटेकोर वेळेच्या नियोजनानुसार हे प्रशिक्षण येथे चालु होते. शिक्षकांना भविष्याचा वेध व वर्तमानातील शिक्षण क्षेत्रातील बदल अंगीकारण्याचे मार्गदर्शन या माध्यमातून होत असते. सेवेच्या 12 वर्ष पूर्तीनंतर वरीष्ठ श्रेणी व सेवेच्या 24 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरीष्ठ श्रेणी प्रशिक्षण हे शासनामार्फत देण्यात येते. हे प्रशिक्षण गाजले ते उपस्थिती व वेळेच्या काटेकोरपणा बद्दल . शिक्षण आयुक्त राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रावर समन्वयक मु.अ. बालाजी थोटवे सर यांनी अतिशय सुंदर असे नियोजन व समन्वय साधून हे प्रशिक्षण पार पाडले . प्राचार्य चिटकुलवार सर, नागेश सर, मुदगलवार सर यांच्या सहकार्यातून तसेच सुलभक प्रा. क्षमा करजगावकर, राठोड सर, प्रा. मंगेश शिंदेसर, मुअ मुंगरे सर, लाडकेकर यांनी उत्तम पद्धतीने नियोजन करून हे दहा दिवसीय प्रशिक्षण अत्यंत यशस्वीपणे पार पडले.
यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली . आयुक्त राहुल रेखावार साहेबांनी छान केले त्यामुळे प्रशिक्षण व्यवस्थित घेता आले याबद्दल कौतुक केले व प्रशिक्षण स्थळावरील बैठक व्यवस्था व थंडपाण्याची व्यवस्था चहाचे नियोजन याचे प्रशिक्षणार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.