
छगन भुजबळांची मोठी घोषणा; नाशिकचं पालकमंत्रीपद…
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्याला भुजबळ यांच्या माध्यमातून चौथे मंत्रिपद मिळालंय. त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा वाढल्याची चर्चा सुरू होती.
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघेही पालकमंत्रीपदावर दावा करत आहेत. अशातच छगन भुजबळ यांच्या शपथविधीमुळे दादा भुसे आणि गिरीश महाजन यांचं टेन्शन वाढलं होतं
नाशिकचे पालकत्व नेमके कोणाकडे जाणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान छगन भुजबळ यांनी दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत भुजबळ?
मी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छूक नाही, असं छगन भुजबळ यांनी आज स्पष्ट केलंय. मला नाशिकसाठी जे काही करायचे आहे, ते मी करत आहे असं देखील यावेळी भुजबळांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत भुजबळांनी रस दाखवलेला दिसत नाही, ही दादा भुसे आणि गिरीश महाजनांना दिलासा देणारी बातमी आहे.
…तो मंत्रिमंडळाचा निर्णय
यावेळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलंय की, माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. ढगफुटी देखील काही ठिकाणी झाली आहे. अधिकाऱ्यांसोबत कुंभमेळ्यापासून शहरातील सर्व प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी म्हटलंय की, आर्थिक संदर्भात प्रश्न मंत्रिमंडळात सोडवले जातात.तो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे.
मोठे रणकंदन
मी 35 वर्षापासून शिवसेना सोडली आहे. त्यामुळे मला भरत गोगावले यांची माहिती नाही. शिवसेनेत आता कोण निर्णय घेतात, ते मला माहित नाही. मी बाहेर आल्यानंतर तिथे पुन्हा जाण्याचा प्रश्न नाही. नारायण राणे जाण्याचा प्रश्न देखील अजिबात नाही. मी शिवसेना सोडली, त्यानंतर मोठे रणकंदन झाले होते. बाळासाहेब आणि आमचे देखील मोठे वाद झाले होते. मात्र, नंतरच्या काळात आम्ही एकत्र बसून आम्ही तो संपूर्ण वाद मिटवला. पण त्यावेळी शिवसेनेचे सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे घेत होते, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.