
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी (दि. 15) दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटासंबधी समस्या असल्याना त्यांना गॅस्ट्रो विभागात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत तपशील समोर आलेला नसला तरी, त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्व स्तरातून प्रार्थना केली जात आहे. मागच्या काही दिवसापूर्वी देखील सोनिया गांधी यांची तब्बेत बिघडली होती अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. त्यांच्यावर तज्ञाांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत अशी माहिती आहे. ७ जून रोजी सोनिया गांधी यांनी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथे रुटीन चेक केले होते. त्यांनतर त्यांना हास्पिटलमधून डिस्जार्ज देण्यात आला होता. तसेच पोटासंबधी समस्येमुळे या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या होत्या.
गेल्या काही वर्षात सोनिया गांधी यांच्या तब्येतीत चढउतार
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या सध्या ७८ वर्षांच्या आहेत. त्यांची प्रकृतीत गेल्या काही वर्षात चढउतार होत आहेत. फेब्रुवारीमध्ये त्या पोटासंबधी विकाराने ग्रस्त असल्याने रुग्णालयात दाखल होत्या. सप्टेबर २०२२ मध्ये त्यांनी अमेरिकेत मेडिकल चेकअपसाठी गेल्या होत्या. कोव्हीडमुळे त्यांचे हे मेडिकल चेकअप पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे त्या २०२२ मध्ये अमेरिकेत गेल्या यावेळी त्यांचे पुत्र काँग्रेस नेते राहूल गांधी सोबत होते.