
अपात्र ठरवण्याचा विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय…
राजकारणामध्ये चढउतार येत असतात, नाराज व्हायचं नसतं.. महाडिकांचा सतेज पाटलांना सल्ला!
राजकारणामध्ये चढउतार येत असतात. मात्र, कधी नाराज व्हायचं नसतं. आम्ही कधी म्हटलं नाही की आम्ही एकटे पडलो आहोत.
2019 लोकसभा निवडणुकीमध्ये माझा घात झाला होता. विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला होता. गोकुळमधील आमची सत्ता गेली होती. मात्र, आम्ही कधी नाराज झालो नाही. आम्ही कधी नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
भाजप लबाड…भास्कर जाधवांनी उद्धव सैनिकांना केले अलर्ट
भाजप आपला जुना लाबड मित्र आहे. त्यांच्यापासून सावध राहा. आता महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना केली जात आहे. ते आपला फायदा आणि सोयीनुसार प्रभागातील मतदारांची कापाकापी करणार आहेत. त्याकडे लक्ष ठेवा, अशी धोक्याची सूचना माजी मंत्री तसेच उद्धव सेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांना दिली.
जगातल्या मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महापालिकेत अडकलायं..
शिवसेना भवनात झालेल्या बैठकीदरम्यान, ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली. चिंधीचोर मिंधे भाजपसोबत गेला, मिंधे स्वत:ला मोदींचा घरगडी म्हणतो, घरगड्याची शेती बघा, शेतीत हेलिकॉप्टर, संपत्ती मालकापेक्षा जास्त आहे. भाजप आणि मिंधे मुंबई आदानींच्या खिशात घालू पाहात आहेत असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे. जगातल्या मोठ्या पक्षाचा बीएमसीमध्ये जीव अडकला आहे, अशीही टीका ठाकरेंनी केली आहे.
मंत्री संजय शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 आॅगस्ट रोजी मुंबईत धडक देणार आहेत. आरक्षणाच्या मागणीवर सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक दिली आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली.
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेतला. न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठवेत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.