
निरागस भक्ती पाहून डोळ्यांत येईल पाणी…
आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात.
अशात ते पंढरपूरी जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच डान्स करताना दिसतात. या वारीत येणाऱ्या लोकांची वयाची काही सीमा नसते. अनेक तरुणही या वारीत सहभागी होतात तर दुसरीकडे म्हातारो आजी-आजोबा आपल्याला या वारीत दिसतात. अशाच एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणार एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त पांडुरंग पांडुरंग. आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो. या सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी कित्येक किलोमिटरचा टप्पा पार करत पांडुरंगाला पाहण्यासाठी जातात. या वारीत सहभागी झाल्यावर प्रत्येकजण एकच सांगतो ते म्हणजे, “प्रत्येकानं एकदा तरी वारी नक्की अनुभवावी”अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा असणारा विठ्ठल महाराष्ट्राचे दैवत म्हणून ओळखला जातो.सध्या विठ्ठलाच्या नामाचे संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून निघालाय. अशातच एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होतोय यामध्ये एका चिमुकल्या विठ्ठलाला पाहून आजोबा भावूक झाले असून माझ्या विठ्ठलाने मला दर्शन दिले म्हणत ते चिमुकल्याच्या पायावर नतमस्तक झाले आहेत. या आजोबांची निरागस निस्वार्थ भक्ती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.