
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
भोर/पुणे : जनसंघ अर्थात भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीचा पाया रचणारे आणि “एक देश में दो निशान, दो विधान और दो प्रधान नही चलेगा”, अशी महत्वपूर्ण घोषणा देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भोर तालुक्यातील निगुडघर येथे सोमवारी ( दि. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र कंक यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय राऊत , अनिल गायकवाड, दत्तात्रेय रेणुसे, भाऊ दिघे , अभिमन्यू गाडे , मारुती रेणुसे, रमेश शिंदे, राजू मळेकर , राहुल मळेकर , नामदेव मसुरकर, सुरज चव्हाण, राजेश कुडले , समीर घोडेकर , डॉ. आनंदा कंक, बाळू रेणुसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.