दैनिक चालु वार्ता मुदखेड – प्रतिनिधी-शिवाजी एडके
मुदखेड : मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना शासनाकडून मोफत बससेवा दिली जाते. कारण ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात व्यत्यय येऊन नये व त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी पहिली ते दहावी च्या विद्यार्थिंनींना शाळेत जाण्यासाठी मोफत बस सेवा दिली जाते परंतु धनज व सरेगाव येथील 70 ते 80 विद्यार्थिनी बारड येथील स्व. सेनानी राजाराम बापू माध्यमिक शाळा, बारड येथे शिक्षण घेत आहेत. पण शाळेत जाण्यासाठी विद्यार्थिंनींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि जादा पैसे मोजून खासगी वाहनांचा वापर करून शाळा गाठावी लागते व वेळेवर शाळेत जाता येत नाही. अनेक विद्यार्थिंनींना या बस अभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळेच धनज व सरेगाव येथील ग्रामस्थांनी दोन्ही ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन जिल्हाधिकारी, तहसिलदार व आगारप्रमुख नांदेड यांना निवेदन दिेले आहे.
सदरील निवेदनात बस फेरी धनज व सरेगाव या ठिकाणी वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे. आणि लागलीच शाळा सुरू झाल्याने लवकरात लवकर बससेवा सुरू करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यामुळे मुलींच्या शिक्षणामध्ये नक्कीच वाढ होईल.