
दैनिक चालू वार्ता धाराशिव प्रतिनिधी -समीर मुल्ला
दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी या सारख्या तब्बल १७ गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला ‘कुख्यात’ गुन्हेगार हा पोलिसांच्या रडारवर असलेला अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुन्हेगारास धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
बुधवार (दि.२५ ) रोजी शहर परिसरातील वरुडा पुलाजवळ सापळा रचून ही कारवाई केली. गस्तीदरम्यान गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती मिळाली कि कुख्यात गुन्हेगार हा काही कामानिमित्त धाराशिव शहरात येणार आहे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पोलिसांना अनेक वर्षांपासून गुंगारा देऊन फरार असलेला अटल गुन्हेगार मोतीराम उर्फ कुक्या बादल शिंदे (रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) याला शिताफीने ताब्यात घेतले.
कुख्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे पाहता तो धाराशिव, लातूर, बीड, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर तब्बल पाच दरोडे, एक जबरी चोरी, एक दरोड्याचा प्रयत्न आणि दहा मोटरसायकल व डिझेल चोरीचे गुन्हे नोंद आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये तपास अधिकाऱ्यांना गुंगारा देत असलेल्या कुख्यात गुन्हेगाराचा अखेर पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर कारवाई ही धाराशिव पोलीस अधीक्षक रितु खोखर , अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलिस हवालदार शौकत पठाण,जावेद काझी,प्रकाश औताडे , फरहान पठाण,चालक पोलीस काॅन्सटेबल नितीन भोसले, रत्नदीप डोंगरे याच्या पथकाने केली
.