दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
केहाळ वडगाव ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोफत असंलेल्या घरकुल सर्वेसाठी हजार -हजार वसुली केल्याची दैनिक चालु वार्ताने पोलखोल केल्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केलेल्या वसुलीमुळे गावकर्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. शासनाच्या योजनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्याचे काम ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे आहे. मात्र योजनासाठी वसुली केल्यामुळे केहाळ वडगाव ग्रामपंचायतचे अधिकारी आहेत की वसुली अधिकारी आहे असे गावकरी बोलत आहेत.गावात बोगस काम करून ग्रामपंचायत अधिकारी भ्रष्टाचार करून शासनाने सामन्यासाठी दिलेल्या निधीतून खिसे भरण्याचे काम करीत आहे.एवढे चालु असतांना साहेबाने घरपट्टी नळपट्टी वसुली करून गफळा केल्याचा आणखी एक कारनामा गावकऱ्याच्या चर्च्यामधून पुढे आला आहे.
गतवर्षी गावात विद्युत वितरण कंपनीने होत असलेली विजेचे चोरी कमी करण्यासाठी विद्युत वाहक तारा काढुन केबलद्वारे विदयुत पुरवठा केल्यामुळे गावकऱ्यांना विद्युत मीटर घ्यावे लागले मीटरसाठी नमुना नंबर आठची गरज होती ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी नमुना आठसाठी गावकर्यांकडुन घरपट्टी नळपट्टीच्या नावाखाली पावत्या न देता वसुली केली त्यानंतर गावात टप्या टप्याने साठ ते सत्तर घरकुल आले होते.त्याकरता जागा नावावार करण्यासाठी, घरपट्टी नळपट्टीच्या नावाखाली लाभार्थ्यांकडुन पावत्या न देता १००० ते २००० रुपये पर्यंत वसुली करून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गफळा केल्याचा गावकारी सांगत आहे.कारण की ग्रामपंचायतने वसुली केलेल्या कराची रीतसर पावत्या देणे बंधनकारक असुन वसुल केलीली रक्कम ग्रामनिधीच्या खात्यात भरावी लागते वसुल केलीली रक्कम किती झाली कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आली याची माहिती गावाकऱ्या समोर ग्रामसभेत मांडावी लागते मात्र हे महाशेय महिना -महिना गावात येत नाही ना ग्रामसभा ना हिशोब देतात आलेत फक्त मलईच्या कामासाठी गावात येतात घरच्या सारखी वसुली करतात असे गावातील नागरिक सांगत आहेत.